Pune Crime News | मित्रांसोबत फिरायला गेला अन् गमावला जीव, मुळशीतील प्लस व्हॅलीच्या 1200 फूट खोल दरीत तरुण पर्यटकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ताम्हिणी मधील प्लस व्हॅली (Plus Valley Tamhini) परिसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी (Tourism) आलेल्या एका तरुण पर्यटकाचा अंदाजे 1200 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू (Death) झाला. ही घटना मंगळवारी (दि.12) दुपारच्या सुमारास घडली आहे. रोहन विरेश लोणी Rohan Viresh Loni (वय 21 मुळ रा. सोलापूर, सध्या रा. पिंपरी चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)

रोहन लोणी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिक्षणानिमित्त सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी रोहन त्याच्या पाच मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता. यावेळी रोहन अंघोळ करण्यासाठी एका कुंडात उतरला. (Pune Crime News)

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो कुंडात बुडू लागला. इतर मित्रांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, स्थानिक लोकांनी याची माहिती पौड पोलीस स्टेशनला (Paud Police Station) दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा येथील शिवदुर्ग टीम (Shivdurg Team Lonavala), मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या (Mulshi Disaster Management) टीमने घटनास्थळी धाव घेतली.

शिवदुर्ग टीमच्या पथकाने 1200 फूट खोल दरीतील कुंडात उतरुन रोहनचा मृतदेह बाहेर काढला.
पर्यटनासाठी आलेल्या तुरणाचा कुंडात पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात. मात्र उंच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, कुंडात पोहण्यासाठी उतरणे, तसेच स्टंड देखील करतात. अशा कृत्यांमुळे जीव जाण्याचा धोका असतो.

प्लस व्हॅली जाण्यासाठी बरीच पायपीट आहे. मोठमोठे दगडगोटे, तीव्र उतार अशा ठिकाणीं जाणे येणे किंवा फोटो काढणे सोपे आहे.
पण एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीला बाहेर घेऊन येणे कठीण आहे.
दुपारी साडे चार वाजता शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोहोचली पाण्यातून बॉडी शोधून, बाहेर काढली.
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता परतीचा प्रवास चालू केला.
अंधारात खडतर प्रवास करुन रात्री साडे नऊ वाजता बॉडी वर काढली.

आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोदजी बलकवडे, मानगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा,
पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांनी सहकार्य केले.
तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळची टीममधील सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी,
अशोक उंबरे, सुनिल गायकवाड, योगेश उंबरे, प्रिंन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साठे, अनिल आंद्रे,
रमेश कुंभार यांनी मृतदेह बाहेर काढला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका हरपला

Comedian Santosh Chordia Passed Away | एकपात्री हास्यवी संतोष चोरडिया यांची अचानक एक्झिट; ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात