Pune Crime News | दारुला पैसे न दिल्याने पत्नीचा साडीने आवळला गळा; पतीने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दारु पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

शिला संतोष शिरसाठ (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे महिलेचे नाव असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याप्रकरणी तिचे वडिल माधव नारायण सूर्यवंशी (वय ६०, रा. केदार बुडा, पो. कवाना, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. ४०५/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष शिरसाठ (वय ४०, रा. वारजे माळवाडी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील त्यांच्या घरी २१ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, संतोष शिरसाठ हा मजुरी काम करतो. ते मुळचे नांदेडचे राहणारे आहेत.
सुमारे दीड दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात रहायला आले. संतोष याने दारु पिण्यासाठी शिला हिच्याकडे पैसे मागितले.
त्याला पैसे देण्यास शिला हिने नकार दिला. तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली. संतोष याने शिला हिला शिवीगाळ करुन हाताने
व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून आजू बाजूचे तेथे आल्यावर त्यांनी शिला हिची सुटका केली. शिला हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे वडिल गावाकडून पुण्यात येऊन त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर संतोष शिरसाठ पळून गेला असून पोलीस उपनिरीक्षक ओलेकर (PSI Olekar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार