Pune Crime News | महिलेने गुप्तांगात लपवून आणले 20 लाखांचे सोने, पुणे कस्टम विभागीची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुबईहून पुण्यात आलेल्या एका महिलेने तिच्या गुप्तांगामध्ये तब्बल 20 लाख 30 हजार रुपयांचे 423.41 ग्रॅम सोने तस्करी (Gold Smuggling) करुन आणल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सीमा शुल्क विभागाने Pune Customs Department (कस्टम) उघडकीस आणला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) 41 वर्षीय महिले विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.1 जुलै) एक प्रवासी महिला स्पाईसजेट या विमानाने (Spicejet Aircraft) दुबई ते पुणे असा प्रवास करत होती. पुणे विमानतळावर (Pune International Airport) आल्यानंतर तपासणी करणार्‍या कस्टमच्या अधिकार्‍यांना तिची हालचाल संशयास्पद वाटली. तपासणीसाठी असलेल्या ग्रीन चॅनेलमधून ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या शरीरात तीने काही तरी लपवून आणल्याचे त्यांना आढळून आले. (Pune Crime News )

कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने तेथील महिला
अधिकाऱ्यांना गुप्तांगात लपवून आणलेल्या सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या.
अधिक तपासणीसाठी तिला रूग्णालयात नेऊन तिची तपासणी करण्यात आली. मात्र, तिने आणलेले सर्व कॅप्सूल काढून अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

 

Web Title : Pune Crime News woman caught at pune airport with gold paste worth 20-lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा