Pune Crime News | पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, सराईत गुन्हेगारावर FIR; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीला मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महिलेसोबत अश्लील बोलून विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर (Criminal) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) शनिवारी (दि.4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

याबाबत 30 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. तर वसीम रशीद हजारी उर्फ लाला (Wasim Rashid Hazari alias Lala) याच्यावर आयपीसी 364,507 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी वसीम हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी आणि फिर्यादी यांचे पती हे एकाच कंपनीत काम करतात.
एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते.
आरोपीने फिर्यादी यांना मोबाईलवर फोन करुन अश्लील भाषेत बोलला.
तसेच फिर्यादी यांच्या पतीला मारण्याची (Kill) व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी (Threat)
दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत फिर्यादी यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती