Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | ओळखीचा गैरफायदा घेत त्याने कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध (Gungy Medicine) टाकून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. त्याचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध (Physical Relations) केला. तिला जबरदस्तीने लग्न करायला लावून तिच्या आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी सातारा येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये (Balajinagar, Dhankawadi News) १८ ऑगस्ट २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अभिमन्यू शेरेकर यांची मैत्री होती.
त्यातून त्याने बालाजीनगर येथील घरी फिर्यादीला बोलावले होते. तेथे तिला कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध दिले.
तिला गुंगी आल्यावर तिच्यावर बलात्कार केला. त्याचे फोटो व व्हिडिओ काढले.
हे फोटो व व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर ५ एप्रिल २०२२ रोजी अभिमन्यू त्याचा मित्र प्रशांत कोली व कारचालक यांनी तिला ठाणे येथे नेले.
तेथे त्यांनी फिर्यादी यांचे जबरदस्तीने अभिमन्यु याच्याबरोबर लग्न लावून दिले.
त्यानंतर फिर्यादी यांनी ते फोटो व व्हिडिओ डिलिट करण्याबाबत विचारणा केली असता अभिमन्युचा भाऊ
उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
तिच्या आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली.
त्यानंतर आता फिर्यादी यांनी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात (Rahimatpur Police Station)
फिर्याद दिली असून ती सहकारनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजगुरु तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Woman raped by pouring gungy drug from coldring; A case has been registered against seven people who forced them to marry and beat them up

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात