Pune Crime News | येरवडा : मुलाचा सांभाळ करणार्‍यासच जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | मुलाचा सांभाळ करत असलेल्या मित्रालाच जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन त्याच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये उकळण्याचा (Extortion Case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हनिफ मेहबुब शेख (वय ४०, रा. पर्णकुटी पायथा, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबा ऊर्फ मोहसीन बडेसाब शेख (Moba alias Mohsin Badesab Shaikh) आणि त्याचा मित्र मोईन काळु शेख Moin Kalu Sheikh (रा. येरवडा) यांच्यावर खंडणीचा (Ransom Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००७ पासून ते २९ ऑगस्ट २०२३ पर्यंत वेळोवेळी घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनिफ शेख व मोहसीन शेख हे मित्र आहेत.
फिर्यादी यांनी मोहसीन याच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी स्वत:कडे घेतला आहे.
याचा राग मनात ठेवून मोहसीन हा वेळोवेळी फिर्यादीच्या घरी येऊन त्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत असत.
फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी तीन ते चार लाख रुपये घेऊन गेला.
त्यानंतर आता त्याचा मित्र मोईन शेख हाही शिवीगाळ करुन तू मोहसीनला पैसे का देत नाहीस असे म्हणून आम्हाला
खर्चाला पैसे देत असे म्हणून तुला आता आम्ही जीवंत ठेवणार नाही. तुझी विकेट काढणार आहे, अशा धमक्या देऊ लागला. यांच्याकडून सातत्याने दिला जाणारा त्रास सहन होत नसल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ

Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल