Pune Crime News | आपल्याकडे बॉम्ब आहे; लोहगाव विमानतळावर खळबळ, बॉम्ब लावल्याची महिलेने दिली धमकी

पुणे : Pune Crime News | आपल्या चारही बाजूला बॉम्ब (Bomb) लावले असल्याचे सांगत एका महिलेने लोहगाव विमानतळावर (Lohgaon Airport) खळबळ उडवून दिली. संपूर्ण तपासणीनंतर महिलेने रागाच्या भरात हे सांगितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

निता प्रकाश कृपलानी Nita Prakash Kripalani (वय ७२, रा. सूर्यविहार उद्योग विहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, गुडगाव) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई दिपाली बबनराव झावरे (Police constable Dipali Babanrao Zaware) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०८/२३) दिली आहे. हा प्रकार लोहगाव नागरी विमानतळावर (Pune Airport) गुरुवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निता कृपलानी या पुण्याहून दिल्लीला विमानाने जाणार होत्या. फिर्यादी या विमानतळावर फिस्किंग बुथ येथे कर्तव्यावर होत्या. निता कृपलानी या तेथे आल्या. फिर्यादी या त्यांचे सामान तपासत असताना त्यांनी यात काय आहे, असे विचारले. तेव्हा कृपलानी यांनी यात बॉम्ब असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर फिर्यादी तेथून बाजूला पळाल्या. त्यांनी इतरांना सावध करुन यांच्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत असल्याचे इतरांना कळविले. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली.
या महिलेच्या सामानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
त्यामुळे अफवा पसरवून खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक एस आर करपे (PSI SR Karpe) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या