Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये खुनाचे (Pune Murder Case) सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी मंगला टॉकीज समोर टोळक्याने एकाचा खून केला होता. त्यानंतर आता पुण्यातील वानवडी (Wanwadi) परिसरात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) शनिवारी (दि.2) पहाटे एकच्या सुमारास काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे.

महादेव रघुनाथ मोरे Mahadev Raghunath More (वय-25 रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी (Pune Police) मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना
ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या