Pune Crime | अपघाताची बतावणी करुन टोळक्याने ट्रकचालकाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अपघात झाल्याची बतावणी करुन ट्रकचालकाला धमकावून मोटारीतून आलेल्या तिघांनी रोकड, मोबाइल असा मुद्देमाल लुटल्याची (truck driver got looted over accident) घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील न्याती इस्टेट (Nyati Estate) समोरील वनीकरण क्षेत्रात शनिवारी (दि.28) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत मोटारीतील तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हाकम अब्दुल मजीद (वय-50 रा. सिकरावा गाव मेवाड राज्य राजस्थान) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मजीद यांच्या तक्रारीवरुन तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Corporation Amenity Space | पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादीने एकमताने घेतला ‘हा’ निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजीद हे मुळचे राजस्थानमधील (Rajasthan) मेवाड जिल्ह्यातील (Mewar district) रहिवासी असून ते ट्रकचालक आहेत. हैदराबादमधील (Hyderabad) एका कंपनीचा माल पुण्यात पोहचवण्यासाठी ट्रक घेऊन आले होते. न्याती इस्टेट परिसरात मोटारीतून आलेल्या तीन चोरट्यांनी ट्रक थांबवण्याचा इशारा देऊन ट्रक थांबवला.

दुपारी एकच्या सुमारास या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. चोरट्यांनी मोटार ट्रकला आडवी लावली.
मोटारीला ट्रक घासून गेल्याने नुकसान झाल्याची बतावणी केली. ट्रकचालकाला पोलीस ठाण्यात
नेण्याच्या बहाण्याने गाडीत बसविले. आरोपींनी ट्रक चालकाला पोलीस ठाण्यात न नेता
ट्रकचालकाकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण आठ हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 247 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | किरकोळ वादातून भाच्याने मामाचे दात पाडले अन् डोळ्याचा घेतला चावा, आरोपीला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | ob robbed the truck driver in kondhwa police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update