Pune Crime | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या पप्पु खरातला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माथाडी बोर्डाने सदस्यत्व रद्द केल्यानंतरही माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) नावाने प्रत्येक रेल्वे रॅकमागे ५० हजार रुपयांची खंडणी (Extortion) मागून ते न दिल्यास अ‍ॅट्रोसिटीची केस (Atrocity) दाखल करण्याची धमकी (Pune Crime) देऊन जबरदस्तीने 2 लाख ९० हजार रुपयांची खंडणी घेणार्‍याला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) अटक केली आहे.

पप्पु भिवा खरात Pappu Bhiwa Kharat (वय ३६, रा. औंध) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या अधिकार्‍यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकी रेल्वे स्थानकावरील (Khadki Railway Station) मालधक्का येथे १६ एप्रिल ते ३१ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पु खरात हा पूर्वी हमाल संघटनेत काम करायचा. त्याला त्यातून काढून टाकले. माथाडी बोर्डानेही त्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. असे असले तरी खडकी रेल्वे स्थानकावरील मालधक्का येथे आलेल्या रेल्वे रॅकमधून माल बाहेर काढण्यासाठी तो प्रत्येक रॅकमागे ५० हजार रुपयांची मागणी करीत असतो. फिर्यादी यांच्या कंपनीकडे महिंद्रा कंपनीचे माल लोडिंग व अनलोडिंग करण्याचे काम मिळाले आहे.

पप्पु खरात याने लोडिंग व अनलोडिंगचे कामात १६ एप्रिल, १७ एप्रिल व ७ जुलै रोजी अडथळा निर्माण केला. त्याने अडथळा निर्माण करु नये, म्हणून कंपनीकडून त्याला वेळोवेळी २० -२० हजार रुपये मिळून असे एकूण १ लाख ९० हजार रुपये दिले होते. असे असतानाही त्याने ३० ऑगस्ट रोजी अनलोडिंगचे काम थांबवून काम चालू करायचे असल्यास प्रति रॅकला ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तुम्हाला काम करुन देणार नाही, तुमच्यावर अ‍ॅट्रासिटीची खोटी केस करतो, असे म्हणून धमकी दिली व कंपनीकडून १ लाख रुपये असे एकूण २ लाख ९० हजार रुपये खंडणी वसुल केली. तरी त्याचा त्रास सुरुच असल्याने शेवटी कंपनीच्या वतीने फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे (PSI Arjun Bendgude) तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव,
प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे,
सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे,
पवन भोसले, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pappu Kharat, who demanded extortion in the name of Mathadi, was arrested by the crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा