Pune Crime | चोरीचे वीज कनेक्शन तोडण्यास गेलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की, दिली जीवे मारण्याची धमकी; केसनंदमधील घटना

पुणे : Pune Crime | बेकायदेशीरपणे चोरीचे घेतलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केसनंद मधील जोगेश्वरी सनसिटीमध्ये घडला. याप्रकरणी गणेश अप्पाराव श्रीखंडे (वय ३३, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यावरुन पिंटु ऊर्फ जयंत सरडे (रा. कोरेगाव भिमा, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

गणेश श्रीखंडे आणि त्यांचे सहकारी अंजन शिंगणे हे केसनंदमधील मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि. निर्मित जोगेश्वरी सनसिटीमध्ये  शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते. तेथे बेकायदेशीर चोरीने घेतलेले वीज कनेक्शनवर कारवाई करत होते. त्यावेळी सरडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करुन दमदाटी व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देऊन ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांचे सहकारी अंजन शिंगणे याच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

Union Minister Narayan Rane | ‘एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, BJP मध्ये आले तर स्वागतच’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | People beat mseb wireman in kesnand area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update