Pune Crime | PM आवास योजनेतील व्हीआयपी कोठ्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | पंतप्रधान आवास योजनेतील (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळवून देतो, असे सांगून पाच जणांची फसवणूक करणार्‍या दोघांना निगडी पोलिसांनी (Nigdi Police) अटक (Pune Crime) केली आहे.

आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे),
योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. घुलेनगर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी रवींद्र बबन शिंदे (वय ३१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिंदे व इतर संतोष चव्हाण, गोरक्षनाथ गवंड, प्रविण गावडे, बबन लोंबाटे यांना या दोघांनी चिखलीमधील (chikhli) घरकुल (Gharkul) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळून देतो.
असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून त्यासाठी वेळोवेळी ७ लाख ६२ हजार रुपये घेतले.
मात्र, त्यांना घर व गाळा मिळवून दिला नाही.
तसेच त्यासाठी घेतलेले पैसे परत केले नाही.
फिर्यादी व इतरांनी अनेकदा पैशांची मागणी केल्यानंतरही ते न दिल्याने शेवटी त्यांनी
पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ
(Assistant Police Inspector Vijaykumar Dhumal) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | PM arrested for cheating under the guise of getting a house from a VIP room in the housing scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

Coronavirus | कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR