Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाणेर (Baner) येथील आलिशान सोसायटीत थाई स्पाच्या (Thai Spa In Baner) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरु होता. त्याचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Crime Branch SS Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. बाणेर येथील डिव्हाईन स्पावर (Divine Spa Baner Gaon Balewadi Phata) कारवाई करुन पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

स्पाचा मालक (Spa Owner) दीपक कृष्णा पाटील Deepak Krishna Patil (वय २६, रा. डिव्हाईन स्पा, साई हेरिटेज, बाणेर), पंचमाया लेपचा Panchmaya Lepcha (रा. रिच लाईन, लिंक रोड, पाषाण), स्पाचा मॅनेजर सचिन प्रकाश शिंदे Sachin Prakash Shinde (वय २४, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी – Kalewadi) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच प्रविण धोंडीराम दुरगुडे Pravin Dhondiram Durgude (वय २५, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

बाणेर येथील आलिशान साई हेरिटेज सोसायटीतील (Sai Heritage, Baner) पहिल्या मजल्यावर डिव्हाईन स्पा हे थाई मसाज सेंटर चालविण्यात येत होते. येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक (Decoy Customer) तेथे पाठविले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी डिव्हाईन स्पावर छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या तीन तरुणींची सुटका करुन स्पा मालक व मॅनेजर अशा तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) तपास करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranic),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) आणि त्यांच्या पथकातील  कर्मचाऱ्यांनी केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Prostitution under the name of spa exposed in a luxurious society in Pune Three arrested in action at Divine Spa in Baner

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा