Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर’ ! सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत तरुणीचा घेतला चावा, येरवड्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकतर्फी प्रेमातून (Single Sided Love) चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तरुणीचे अपहरण करुन तिला ‘‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर,’’ असे म्हणून तिचा चावा घेऊन मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यातील (Yerwada) साळवेनगर येथे घडला आहे (Pune criminal bite girl in single sided love).
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) सराईत गुन्हेगार निहाल विशाल भाट Nihal Vishal Bhat (रा. कंजारभाट, येरवडा) याच्याविरुद्ध अपहरण (Kidnapping), विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून शाळेत शिरुन अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला (Attempt To Kill) करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर येरवड्यामध्येच हा दुसरा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी घरात असताना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निहाल तेथे आला.
हातात चाकू घेऊन तो तिच्या घरासमोर उभा राहिला. ‘‘तू घराबाहेर ये,
माझ्या सोबत चल असे म्हणून त्याने हातातील चाकू हवेत फिरवून तू जर बाहेर आली नाही तर,
मी दरवाजा तोडून घरात घुसेल व मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर, मी त्याला जिवंत सोडणार नाही, ’’अशी धमकी दिली.
त्यानंतर भाट याने चाकूचा धाक दाखवून या तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून स्वत:च्या घरी घेऊन गेला.
(Pune Crime) ‘‘माझे तुझ्यावर प्रेम आहे़ माझ्यासोबत लग्न कर’’ असे तिला म्हणाला.
त्याला तिने नकार दिल्यावर त्याने या तरुणीच्या तोंडावर मारहाण करुन दंडावर, पाठीवर,
गालावर दाताने चावे घेऊन जखमी केले. तसेच हातातील चाकूने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन जखमी केले.
या तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली.
जखमांवर उपचार केल्यानंतर रविवारी तिने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गोताडे तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune criminal bite girl in single sided love Yerwada Police Station Incident Kidnapping And Molestation Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा