Pune Crime | 3 सराईत गुन्हेगारांना अटक, अलंकार पोलिसांकडून वाहनचोरीचे 11 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अलंकार पोलिसांनी (Alankar Police Station) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले असून 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकाला पंढरपूर (Pandharpur) येथून अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

उमेश विठ्ठल पवार Umesh Vitthal Pawar (वय-32 रा. मु.पो. मुंगशी वाळुज, ता. बार्शी, जि. सोलापूर Solapur), साहील गुलाब ठोंबरे Sahil Gulab Thombre (वय-18 रा.इंगळे नगर, आरंभ सोसायटीजवळ, भुगाव Bhugaon, पुणे), श्री गणेश वाघमारे Shri Ganesh Waghmare (वय-20 रा. कदम वस्ती, राहुलनगर, शिवणे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime)

 

अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना उमेश पवार हा पंढरपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे शहरात (Pune City) प्रवासाकरीता अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 6, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या (Hinjewadi Police Station) हद्दीतून 2, वाकड पोलीस स्टेशनच्या (Wakad Police Station) हद्दीतून 1 आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या (Deccan Police Station) हद्दीतून 1 असे 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर साहील ठोंबरे आणि वाघमारे या दोघांना वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करुन चोरलेली दुचाकी जप्त केली आहे.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Senior Police Inspector of Rajendra Sahane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील (Police Inspector Sangeeta Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे (PSI Suryakant saptale),
पोलीस अंमलदार सागर केकाण, निशीकांत सावंत, धिरज पवार, हरीष गायकवाड, शरद चव्हाण,
आशिष राठोड, शशीकांत सपकाळ, नितीन राऊत यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Arrest 3 criminals , Alankar police Solve 11 cases of vehicle theft

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा