Pune Crime | पुण्याच्या बाणेर परिसरात ‘स्पा सेंटर’मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाणेर (Baner) येथील एका सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला पर्दाफाश आहे. पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. स्पा मालक व मॅनेजरला अटक (Arrest) करण्यात आली (Pune Crime) आहे.

 

झेया स्पा (Zeya Spa Baner) मालक आणि मॅनेजर फजल अब्दुल मतीन अहमद Manager Fazal Abdul Matin Ahmed (वय 24, रा. येरवडा – Yerwada) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे (Police Constable Manisha Pukale) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. बाणेर येथील एका सोसायटीत झेया स्पा नावाने मसाज सेंटर चालविले जाते. या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरुन बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून खात्री करण्यात आली.
त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता तेथे छापा टाकण्यात आला.
त्यावेळी तेथे 4 महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत होता.
या चारही पिडित महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले असून स्पा मालक व मॅनेजर यांना अटक (Pune Crime) करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crimbe Branch Social Security Cell Exposed Prostitute Racket in Zeya Spa Center of Baner police arrest owner and manager

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा