Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या (Bike thieves) दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक (Anti-robbery and anti-vehicle theft squad) दोन ने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुणे शहर (Pune Crime) आणि परिसात वाहन चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी (Four wheeler) जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.19) वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील लगडबाबा मठाजवळ (Lagadbaba Math) केली.

 

पप्पु नेकाराम चौधरी (वय-20 रा. दर्शननगर, पुनावळे, पिंपरी चिंचवड मुळ रा. मु.पो. सादडी, ता. देसुरी, जि. पाली राजस्थान), सतिश अमरसिंह पवार (वय-23 रा. मु.पो. मारुंजी ता. मुळशी मुळ रा. मु.पो. काळीदौलत ता. महागांव जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), कोथरुड (kothrud Police Station), चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), वाकड (Wakad Police Station), तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade Police Station), निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीतून वाहने चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. (Pune Crime)

दरोडा व वाहन विरोधी पथक वाहन चोर आणि सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार राजेश लोखंडे (Rajesh Lokhande) व शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांना आरोपींची माहिती मिळाली की, दोन सराईत वाहन चोर वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगडबाबा मठाजवळ त्यांच्याकडे असलेली होंडा शाईन (Honda Shine) दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (Senior Police Inspector Sunil Pandharkar),
पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI gunga jagtap), पोलीस अंमलदार राजेश अभंगे, राजेश लोखंडे,
विनायक रामाणे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two for stealing two-wheeler for fun, seizes 9 vehicles worth Rs 3 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | संजय राऊतांचा गृहमंत्री अमित शहांवर पलटवार, म्हणाले – ‘हॉटेल ब्लू सीमध्ये काय ठरलं होतं?’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’

Urfi Javed Bold | उर्फी जावेदचे मोनोकनी घातलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली चक्क मिया खलिफासोबत तुलना; म्हणाले – ‘जाऊन पॉर्न व्हिडिओ बनव’