Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने काल (रविवारी) पुण्यात कार्यकर्त्याच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. त्यावेळी पाटील यांनी अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं गूढ सांगितलं आहे.

 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘बूथ हा शब्द अमित शाह यांनी दिला. ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना कुणाला झोपून देत नव्हते. ज्या आसाममध्ये (Assam) अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे तो आसाम हातातून जाईल असं वाटत होतं. तो आसाम बूथ संपर्क योजनेमुळे आसाममध्ये एकदा नाही तर दोनदा विजय मिळाला. ज्या ईशान्य भारतातील सेवन सिस्टर स्टेट राज्ये ख्रिश्चनीकरणामुळे हातातून जातील असं वाटत होतं त्यातील त्रिपुरासह, नागालँड, मिझोराम, मेघालयातही सरकार आलं. ही किमया तुम्ही आम्हाला शिकवली. आता आम्ही कुणाला सोडत नाही, असं पाटील म्हणाले.

दरम्यान. पुढे पाटील म्हणाले, 2014 मध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपा सोडून कुणालाच 100 चा आकडा पार करता आला नाही. हे देखील बूथ योजनेमुळेच झालं. हे एकदाच झालं नाही, तर 2019 मध्ये देखील तसंच झालं. त्यावेळी धोका देऊन सरकार बनलं नाही, पण 105 आमदार निवडून आले. त्याआधी 2014 मध्ये 122 आमदार निवडून आले.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on strategy of home minister amit shah for bjp victory in assam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात भरदिवसा मानेला कोयता लावून सराईत गुन्हेगाराने तरुणाला लुटले

Gopichand Padalkar | बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी पुण्यात ‘मल्हार महोत्सव 2022 ‘चे आयोजन; गोपीचंद पडळकरांनी दिली माहिती

Maharashtra Temperature | संपूर्ण राज्य गारठले, सर्वत्र हुडहुडी ! महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस होणार तापमानात आणखी घट; पुण्यातील तापमान उद्या 10 तर उत्तर महाराष्ट्रात 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता

CP Sadanand Date | सदानंद दातेंच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन; डॉ. अभय बंग म्हणाले – ‘सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये पोलिसांपुढे लोकशाही टिकविण्याचे आव्हान’

 

MahaTET Question Paper Leak Case | महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेकडं सापडलं घबाड ! जावयाकडून 2 कोटीची रोकड आणि सोनं पुणे पोलिसांकडून जप्त