Pune Crime | जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदा सावकारी करुन गरीबांची पिळवणूक करुन त्यांच्याकडून दामदुप्पट पैसे वसुल करणार्‍या व जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणार्‍या दोघा सावकारांना (Money Lenders in Pune) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) अटक (Arrest) केली आहे. बेकायदा सावकारी करुन लोकांना छळणार्‍यांविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune police) मोहीम उघडली आहे.

 

कासीब कदीर कुरेशी Kashib Qadeer Qureshi (वय – 33, रा. साईनाथ वसाहत, गाडीतळ, हडपसर – Hadapsar) आणि झहीर जुल्फीकार सय्यद Zaheer Zulfiqar Syed (वय – 34, रा. होळकरवाडी ग्रामपंचायत शेजारी, उरुळी देवाची – Uruli Devachi) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी माळवाडी (Malwadi Hadapsar) येथे राहणार्‍या एका 44 वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांनी आर्थिक अडचणीमुळे झहीर सय्यद याच्याकडून दरमहा 8 टक्के दराने 5 लाख रुपये घेतले होते. त्यांनी आतापर्यंत 8 लाख 48 हजार रुपये व्याजाचे व 2 लाख रुपये मुद्दल असे 10 लाख 48 हजार रुपये दिले आहेत. तरी देखील आरोपी झहीर सय्यद हा फिर्यादीकडे 3 लाख 48 हजार रुपयांची मागणी करत होता. जर पैसे दिले नाहीत तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी (Threat) दिली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाकडे संपर्क साधला. त्यांनी झहीर सय्यद याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सजगणे (API Sajagne) तपास करीत आहेत.

दुसर्‍या गुन्ह्यात काळेपडळ येथील एका 24 वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 डिसेंबर 2020 पासून आतापर्यंत घडला आहे. फिर्यादी कासीब कुरेशी यांच्याकडून वेळोवेळी 6 लाख 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांनी 11 लाख 50 हजार रुपये दिले होते. तरीही त्यांच्याकडे कुरेशी हा 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देऊन “मी गुन्हेगार (Pune Criminals) आहे. मला पोलीस स्टेशन, दादागिरी, गुन्हेगारी याने काही फरक पडत नाही. मी हे सगळे करुन बसलो आहे, तु जायचे तर जा पोलीस स्टेशनला” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथकाने कासीब कुरेशी याच्या मुसक्या आवळल्या असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (API Padsalkar) अधिक तपास करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके,
राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, चेतन आपटे,
प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : – Pune Crime | Pune Police Crime Branchs Anti Extortion Cell 2 arrests two moneylenders for threatening to kill them

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा