Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 70 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Nagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 70 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल फिरोज खान Yusuf alias Atul Feroz Khan (वय – 24 रा. लोहीयानगर, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे. युसुफ उर्फ आतुल खान याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

युसुफ उर्फ आतुल खान हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याने त्याच्या साथीदारांसह खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, लाकडी दांडके यासारख्या हत्यारांसह फिरत असताना गंभीर दुखापत करणे,
जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 05 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी युसुफ उर्फ आतुल खान याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Shrihari Bhairat),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 70 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Punes notorious criminal Yusuf alias Atul Khan lodged in Aurangabad Jail for one year CP Amitabh Guptas action against 70 people under MPDA Act Till Date

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा