Pune Crime | पुण्याच्या नर्‍हे परिसरातील सीएनजी पंपावर टोळक्याचा राडा; दहशत पसरवणाऱ्या 6 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सीएनजी पंपावर वाहन रांगेत लावण्यास सांगितल्याच्या कारणावरुन टोळक्याने राडा घालत कामगाराला बेदम मारहाण (Beating) केली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) सहा जणांना अटक केली आहे. हा प्रकार नऱ्हे भागातील सीएनजी पंपावर (CNG Pump In Narhe) घडला. (Pune Crime)

 

याबाबत संदीप आनंदा हांडे Sandeep Ananda Hande (वय 30, रा. सिद्धी टेरेस, रायकरनगर, धायरी) यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime) पोलिसांनी आकाश पासलकर Akash Pasalkar (वय -22), ज्ञानेश्वर पासलकर Dnyaneshwar Pasalkar (वय -24, दोघे रा.आंबेगाव खुर्द), रोहित चव्हाण Rohit Chavan (वय -24, रा. कोल्हेवाडी), निखिल खोपडे Nikhil Khopde (वय-20, रा. आंबाडे, ता. भोर, जि. पुणे), विपुल खोपडे Vipul Khopde (वय-24), किरण खोपडे Kiran Khopde (वय -22, दोघे रा. नऱ्हे) यांना अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नऱ्हे परिसरातील पारी कंपनी चौकामध्ये (Pari Company Chowk) सीएनजी पंप आहे.
सीएनजी पंपावर आरोपी कारमधून आले होते. पंपावर काम करणारे कामगार सतीश जाधव (Worker Satish Jadhav) यांनी आरोपींना गाडी रांगेत लावण्यास सांगितले.
यावरुन आरोपींनी जाधव यांच्यासोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तसेच जाधव यांना बेदम मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली.
या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा सिंहगड पोलिसांनी शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तांदळे (API Tandale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Radha of a mob at a CNG pump in Narrahe area of ​​Pune; 6 terrorists arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता