Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajyasabha Election | राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीबाबत (Rajya Sabha Election) झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

 

संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई (Anil Desai), उदय सामंत (Uday Samant) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) दाखल झाले आहेत.

राज्यसभेवर निवडून (Rajyasabha Election) जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. परंतु संभाजीराजे यांनी मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे याची घोषणा करु शकतात.

 

Web Title :- Rajyasabha Election | sambhajiraje chhatrapati will contest rajya sabha election 2022 as a shivsena supported candidate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’

 

Hotstocks | पैसा डबल ! ‘या’ 20 शेअर्सने 1 महिन्यात पैसे केले दुप्पट, जाणून घ्या नावांची यादी

 

Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)