Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन मेव्हणीवर केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणाने आपल्या मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एकाला अटक केली आहे. हा प्रकार ९ जुलै २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे दोघेही धायरी परिसरात रहायला आहेत. आरोपीचे तक्रारदार तरुणीच्या चुलत बहिणीबरोबर लग्न झाले आहे. आरोपीने जबरदस्तीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना झाडुने मारहाण केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी राहुल याने फिर्यादीला दिली होती. या धमकीमुळे फिर्यादी हा अत्याचार सहन करत होती. शेवटी या अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

हे देखील वाचा

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | rape case in sinhagad road police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update