Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लैगिंक अत्याचारातून एका 12 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

पुणे / पिंपरी : Pune Crime | अल्पवयीन मुलीला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्तीने केलेल्या बलात्कारातून एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाच अटक (Pune Crime) केली आहे.

अक्षय खडे (वय २०, रा. कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा मित्र सुनिल मधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चाकण येथील राक्षेवाडीमध्ये तसेच भामा नदीच्या काठी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन १२ वर्षाची मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून अक्षय खडे व सुनिल मधे यांनी तिच्यावर जबरदस्तीने व आळीपाळीने बलात्कार केला.
त्यानंतर त्यांनी तिला वाटेत वेळोवेळी गाठून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
या अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला.
त्यानंतर तिच्या आईने मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यांनी ती चाकण पोलिसांकडे वर्ग केली आहे.

हे देखील वाचा

Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी ! पोलिसांचा क्लिनिकवर छापा, कथित ‘डॉक्टर’ महिलेसह 3 अटकेत

Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग  चालकाला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | rape on 12 years old girl, born baby

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update