Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून (Whatsapp Group) काढून टाकल्याच्या (Removed) रागातून ग्रुप अ‍ॅडमिनला (Group Admin) बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याची (Cut Tongue) धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) पुण्यातील फुरसुंगी भागात घडली आहे. (Pune Crime News)

याबाबत प्रिती किरण हरपळे (वय-38) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्याच्या फुरसुंगी जवळ असलेल्या ‘ओम साई सोसायटी’त 28 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

फिर्य़ादी प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. सोसायटीत राहणाऱ्या सभासदांनी मिळून सोसायटीचा नावाने एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपचे ॲडमिन फिर्यादी यांचे पती किरण हरपळे हे होते. या ग्रुपमधील सभासद सुरेश पोकळे हे वारंवार अश्लिल मेसेज (Obscene Messages) टाकत असल्याने ग्रुप अ‍ॅडमीन हरपळे यानी पोकळे यांना ‘ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुपमधून काढून टाकले.

आरोपी सुरेश पोकळे यांनी ग्रुपमधून रिमुव्ह का केले? असा मेसेज पाठवला.
मात्र त्याला हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे आरोपीने हरपळे यांना फोन करुन मला तुम्हाला भेटायचे
आहे असे म्हणून हरपळे यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी पोकळे याने ग्रुपमधून मला का काढले अशी विचारणा केली. त्यावेळी हरपळे यांनी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज टाकत आहे. त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या पोकळे यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने किरण हरपळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांची जीभ कापली गेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. शेळके (PSI N. Shelke) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | removing from the whatsapp group cut the tongue of the admin Pune Crime News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)