Pune Crime | नामांकित ब्रॅण्डच्या नावाने कपड्यांची विक्री, कॉपीराईटच्या कायद्यांतर्गत गुन्हे शाखेकडून 5 जणांवर कारवाई; पुण्यातील MG रोडवील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये नामांकित ब्रॅण्डच्या (Branded Clothes) नावाने बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्यांवर कॉपीराईटच्या कायद्यांतर्गत (Copyright Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही करावाई (Pune Crime) लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit-2) पथकाने करुन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट, जॅकेट, ट्रॅक पँट इत्यादी कपड्यांचा समावेश आहे.

 

निसार उद्दीन समशुद्दीन शेख (वय-31 रा. कोंढवा खुर्द), रिझवान इऱशाद कुरेशी (वय-32 रा. भिमपुरा, पुणे), नोमान नझीर शेख (वय-29 रा. कुंबारवाडा, पुणे), सय्यद राफे मकबुल अखतर (वय-32 रा. भवानी पेठ, पुणे), मुस्ताक हसनसाब कुरेशी (वय-30 रा. घोरपडी गाव, पुणे) यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याबाबत एरएनए टेक्नॉलॉजीचे अधिकारी महेंद्र सोहनसिंग देवरा (वय-36 रा. पोस्ट पेरवा, ता. बाली. राजस्थान) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) शुक्रवारी (दि.16) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एमजी रोडवरील (MG Road) फॅशन स्ट्रीटमध्ये (Fashion Street) विविध नामांकित ब्रँण्डच्या नावाखाली बनावट कपड्यांची चोरुन विक्री होत होती.
याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने फॅशन स्ट्रीटमधील विक्रेत्यांच्या गाळ्यांवर एकाच वेळी छापा टाकला.
पथकाने पाच विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 222 टी शर्ट, 102 जॅकेट्स, 134 ट्रॅक पँट असा
दोन लाख 80 हजार रुपयांचे नामांकित कंपन्याचे बनावट कपडे जप्त केले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील (Senior Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), पोलीस अंमलदार गजानन सोनुने,
उज्वल मोकाशी, नागनाथ राख, मोहसीन शेख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Sale of clothes in the name of reputed brand, action against 5 persons by Crime Branch under Copyright Act; MG Roadwheel Types in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन