Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 83 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार सिद्धार्थ उर्फ तोता शहाजी जाधव उर्फ तौसिफ साजीद बागवान याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 83 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सिद्धार्थ उर्फ तोता शहाजी जाधव उर्फ तौसिफ साजीद बागवान Siddharth alias Tota Shahaji Jadhav alias Tausif Sajid Bagwan (वय-28 रा. खड्डा वस्ती, गुलटेकडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत.आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

सिद्धार्थ उर्फ तोता शहाजी जाधव उर्फ तौसिफ साजीद बागवान हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने
त्याच्या साथीदारांसह स्वारगेट भागात तलवार, कोयता, या सारख्या हत्यारांसह फिरताना घरफोडी (Burglary),
बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मागील 5 वर्षात 6 गंभीर गुन्हे (FIR) दाखल
आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या भागातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
सिद्धार्थ उर्फ तोता शहाजी जाधव उर्फ तौसिफ साजीद बागवान याच्यावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एक वर्षासाठी
स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर
(Senior Police Inspector Ashok Indalkar), पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Crime | Sarait criminals in Pune lodged in Yerawada Jail for one year, CP Amitabh Gupta takes action against 83 under MPDA Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

Ajit Pawar | ठाकरे-शिंदे-फडणवीस भेटीवर अजित पवार म्हणाले -‘त्यांनी एकत्र…’

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या