Ajit Pawar | ठाकरे-शिंदे-फडणवीस भेटीवर अजित पवार म्हणाले -‘त्यांनी एकत्र…’  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळी सण (Diwali Festival) सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून दिवाळी पहाट (Diwali Pahat), दीपोत्सव (Deepotsav) आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मनसेच्या (MNS) वतीने देखील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दीपोत्सावाचे आयोजन करण्याता आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांच्या या राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) सततच्या भेटींवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यावर अजित पवारांना (Ajit Pawar) विचारले असता, त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतेय, असे रोख उत्तर अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकारांना दिले.

अजित पवार (Ajit Pawar) सध्या बारामतीत आहेत. येथे ते आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या दीपोत्सववरील भेटींवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी एकत्र येऊ नये का, ते एकत्र आल्यावर तुम्हाला वाईट का वाटते. दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे. एकमेकांना भेटावे आणि शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्या भेटीत आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

राज ठाकरेंच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने ठाकरे आणि भाजप-शिंदे सूत जुळत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि खासदारांचा (MP) नवा गट तयार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली. मागील काळात त्यांच्या युतीबाबत चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यामुळे सर्वांना पुढील काळात ठाकरे भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न सतावतो आहे.

आगामी काळात मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुका आहेत. भाजपला (BJP) शिवसेनेला
पालिकेतून खाली खेचून सत्तेत जायचे आहे. मुंबई महापालिका हे भाजपचे पुढील लक्ष्य आहे.
त्यामुळे ते ठाकरेंचा पाठिंबा घेणार का? राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र येणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on raj thackeray devendra fadnavis eknath shinde meet diwali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Girish Mahajan | ठाकरे शिंदेंच्या भेटीवर गिरीश महाजन म्हणाले -‘ राजकारणात केव्हाही काहीही…’

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या