Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात निवृत्त आर्मी ऑफिसर पती – पत्नीची राहत्या घरात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका सेवानिवृत्त कर्नलने (Retired Colonel) आपल्या पत्नीवर (Wife) डबल बोअरच्या बंदुकीतून (Double Bore Guns) गोळी झाडून (Firing) तिचा खून (Murder) केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत घडली आहे. नारायणसिंग बोरा (Narayan Singh Bora) व चंपा बोरा (Champa Bora) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांनी आत्महत्या (Pune Crime) कोणत्या कराणामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही.

 

निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा (वय 75), चंपा बोरा (वय 63, रा. सिटाडेल सोसायटी -Citadel Society, बी. टी. कवडे रोड, घोरपडी-B. T. Kavade Road, Ghorpadi) अशी मृतांची नावे आहेत.(Pune Crime)

यासंदर्भात पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी सांगितले की, निवृत्त कर्नल बोरा हे पत्नीसह घोरपडी येते राहण्यास आहेत. त्याचा एक मुलगा व जावई दोघेही लष्करात (Army) कार्यरत आहेत. तर त्यांचा दुसरा मुलगा मुंबई (Mumbai) येथे राहतो. मुलगी दिल्लीत (Delhi) स्थायिक झाली आहे. त्यांचा मुलगा वडील नारायणसिंग बोरा यांना फोन करत होता. मात्र, ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे मुलाने त्यांच्या मित्रांना घरी पाठवले.

 

मुलाच्या मित्रांनी घरी जाऊन दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या सेक्रटरी यांना याबाबत माहिती दिली. सेक्रटरी यांनी याबाबत मुंढवा पोलिसांना (Pune Police) माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बोरा यांच्या घरी धाव घेतली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी बोरा दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! Husband and wife of a retired Army officer commit suicide by firing a revolver at their residence in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा