Pune Crime | पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा; जुगार अड्डा चालविणार्‍यांसह 16 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | औंध येथील दर्शन हॉटेलच्या (Darshan Hotel At Aundh) पाठीमागील बाजूला मुळा नदी किनारी (Mula River) सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने (Pune Police) छापा टाकून जुगार अड्डा चालकासह १६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह १६ हजारांचा माल जप्त केला आहे. (Pune Crime)

 

हा जुगार अड्डा अनिल तागडे आणि झुलकर अजहर खान (रा. जगताप डेअरी) हे दोघे चालवत असल्याचे आढळून आले आहे.
मुदलप्पा कानपूर्ती (रा. रामनगर, रहाटणी), बाळासाहेब सुरवसे (रा. वारजे माळवाडी), सचिन सिताफळे (रा. काळेवाडी), रवी गवळी (रा. पिंपळे सौदागर), सुनिल सातव (रा. नवी सांगवी), रघुनाथ गायकवाड (रा. दापोली), अंतुल पिंटू (रा. म्हाळुंगे), सूर्यकांत कांबळे (रा. औंध गाव), विकास गायकवाड (रा. काळेवाडी), प्रभाकर ठाकरे (रा. चिखली), भगवान मोहिते (रा. पिंपळे सौदागर), लक्ष्मण दहिभाते (रा. काळेवाडी), बाळासाहेब शिवले (रा. दापोडी) अशी जुगार अड्ड्यावर ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. (Pune Police Raid On Gambling Den)

याप्रकरणी पोलीस शिपाई शाम शिंदे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१९/२२) दिली आहे.
परिमंडळ ४ च्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर (Illegal Trades In Pune) लक्ष ठेवून ते सुरु असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपायुक्त कार्यालयात एक विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे (Pune Crime).
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी या पथकाला बोलावून त्यांना औंध येथील हॉटेल दर्शनच्या पाठीमागे नदी किनारी अवैध धंदा सुरु असल्याची बातमी मिळाली असून तेथे जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमरे व इतर पोलीस कर्मचारी यांचे पथक तेथे पोहचले. तेथे मुळा नदीच्या किनारी मोकळ्या जागेमध्ये भिंतीलगत काही लोक खुर्च्या टाकून पॅडवर लिहित बसले होते.
काही लोक त्यांच्यासमोर उभे राहून काहीतरी सांगून पैसे देऊन चिठ्या घेत असल्याचे दिसून आले.
त्यानुसार पोलिसांनी चारही बाजूने घेराव घालून त्यांना पकडले.
मुदलप्पा कानपूर्ती, बाळासाहेब सुरवसे आणि सचिन सिताफळे हे जुगार घेत होते.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १५ हजार ९८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा जुगार अड्डा अनिल तागडे आणि झुलकर खान यांचा असल्याचे सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime | Special team of Deputy Commissioner of Police raids gambling den in Pune 16 arrested for gambling

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा