Pune Fire News | पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 12 दुचाकीसह कार जळून खाक; जांभुळवाडी येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | जांभुळवाडी (Jambhulwadi) येथील साईप्रसाद या इमारतीच्या (Sai Prasad Building) पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत १२ दुचाकींसह एका कार जळून खाक झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. (Pune Fire News)

 

याबाबत अग्निशमन दलाकडून (Pune Fire Brigade) दिलेल्या माहितीनुसार, दरी पुलाजवळ साई प्रसाद इमारत आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची खबर रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी अग्निशामन दलाला मिळाली. त्यापाठोपाठ अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविली. मात्र, तोपर्यंत पार्किंगमधील सर्व वाहने जळून खाक झाली होती. (Pune Fire News)

या आगीत १२ दुचाकी आणि एक कार जळून खाक झाली. दुर्घटनेची चौकशी करताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ही घटना घडण्यापूर्वी काही वेळ अगोदर कार तेथे आली होती.
या कारमध्ये शॉकसर्किंट (Short Circuit In Car) होऊन आग लागली.
एकाने कारचे टायर पेटलेले पाहिले, असल्याचे सांगितले.
कारला लागलेली आग शेजारी पार्क केलेल्या दुचाकीपर्यंत पसरली आणि एका मागोमाग सर्व दुचाकी आगीच्या खाईत सापडल्या.

 

Web Title :- Pune Fire News | A fire in a parking lot burned a car with 12 bikes; Incident at Jambhulwadi near katraj of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा