×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पत्नीला मदत करणार्‍या मित्राला डांबून ठेवलं, पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचा...

Pune Crime | पत्नीला मदत करणार्‍या मित्राला डांबून ठेवलं, पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचा प्रताप; FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीला मदत करणाऱ्या मित्राला पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांने राहत्या घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. पोलिस कर्मचार्‍याची पत्नी, तिचा मित्र आणि पोलिस हे महाविद्यालयीन मित्र आहेत. संबंधित पोलिस कर्मचार्‍याविरूध्द पुण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल काळे Policeman Vishal Kale (रा. शिवाजीनगर पोलीस लाईन shivaji nagar police line) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (faraskhana police station) अमृत जाधव Amrut Jadhav (वय 37) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हे पुणे शहर पोलीस दलात (Pune Police) पोलीस कर्मचारी आहेत. त्यांची नेमणूक चतुःशृंगी पोलीस (chaturshringi police station) ठाण्यात आहे. दरम्यान त्यांचे आणि पत्नीचे कौटुंबिक वाद आहेत. दरम्यान विशाल, फिर्यादी अमृत आणि विशाल यांची पत्नी हे महाविद्यालयीन मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.

मात्र विशाल व त्यांच्या पत्नीचे वाद होत असत.
त्यावेळी अमृत हे अमोल यांच्या पत्नीला मदत करत होता. हा प्रकार विशाल यांना समजला.
यावेळी त्यांनी मित्र अमृत यांना मदत करत जाऊ नको असे म्हणत वाद घातला. तर एका दिवशी विशालने फिर्यादी राहत असलेल्या कसबा पेठेतील घरी जबरदस्तीने प्रवेश केला.
त्यानंतर त्यांच्या मुलाला व फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ केली.
तसेच त्यांच्या घराची बाहेरून कडी लावत त्यांना डांबून ठेवले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस (faraskhana police) करत आहेत.

Web Title : Pune Crime | The friend who was helping his wife was stopped,
the glory of a Pune police constable; FIR filed

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

Must Read
Related News