Pune Crime | हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खून प्रकरणी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या आज काय झालं कोर्टात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्यवसायिक स्पर्धेतून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे (Ramdas Akhade) यांचा खून केल्या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Lonikalbhor police) आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने (Court) त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर या प्रकरणी यापूर्वी अटक आरोपींच्या पोलीस कोठडीत देखील २९ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

निलेश आरते (वय २३) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०), निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्याची नावे आहेत. सोमवारी सर्व नऊ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरते, चौधरी, खेडेकर, माने, खडसे, दाभाडे यांच्यावर हडपसर, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

पुराव्याची साखळी तयार करायची आहे. नेमका कशा प्रकारे कट रचला गेला?,
त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली?, गुन्ह्यातील हत्यारे कोठून आणली?,
नव्याने अटक केलेला आरोपी आणि अल्पवयीन मुलाला पळून जाण्याचा कोणी मदत केली?,
या आरोपींचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का?,
याचा तपास करण्यासाठी आरते याला पोलीस कोठडी व इतरांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित (Public Prosecutor Sanjay Dixit) यांनी केली.
त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आस. आर. पाटील यांनी आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे (Loni Kalbhor Police)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The number of accused in the murder case of Hotel Garva owner Ramdas Akhade is likely to increase, find out what happened in court today.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti-Corruption | पोलिस उपनिरीक्षक 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर