Pune Crime | जेवणाच्या थाळीवरील ऑफर पडली दीड लाखाला; शहरातील नामांकित डायनिंग हॉलचे बनावट नंबर Google वर

पुणे : Pune Crime | शहरातील नामांकित थाळी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डायनिंग हॉलच्या थाळीवर ऑफर असल्याचे सांगून लिंक पाठवून सायबर (Cyber) चोरट्याने तब्बल 1 लाख 44 हजार 497 रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मगरपट्टा (magarpatta) येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

फिर्यादी महिला यांना 6 मार्च रोजी घरपोच थाळी मागवायची होती. त्यांनी सुकांता थाळीचा गुुगलवरील नंबर पाहून संपर्क साधला. तेव्हा त्यांना थाळी बुक करण्यासाठी लिंक पाठवून ती भरुन पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लिंक ओपन करुन भरुन पाठविली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार 497 रुपये ट्रान्सफर करुन त्यांची फसवणूक केली. त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन पुढील तपासासाठी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक अडागळे अधिक तपास करीत आहेत.

शहरातील सुकांता, दुर्वांकुर या डायनिंग हॉलचे गुुगल तसेच फेसबुकवर बनावट ऑफर जाहिराती गेल्या अनेक महिन्यांपासून फिरत आहेत. त्यामुळे सातत्याने अनेकांची फसवणूक होत आहे. असे असले तरी या जाहिराती व नंबर अडविण्याचा काहीही प्रयत्न होताना दिसत नाही.

हे देखील वाचा

Petrol Price Today | ‘इथं’ 3 रुपये प्रति लीटर स्वस्त झाले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Fixed Deposit | केवळ 3 वर्षाची FD केल्यास मिळेल 7 टक्केपेक्षा जास्त व्याज; ताबडतोब चेक करा ‘डिटेल्स’

Independence Day 2021 | ‘हे स्वातंत्र्य खोटे आहे’ म्हणणार्‍या डाव्या पक्षांनी पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात फडकवला तिरंगा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | The offer on the dinner plate fell to one and a half lakh; Fake numbers of reputed dining halls in the city on Google

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update