Petrol Price Today | ‘इथं’ 3 रुपये प्रति लीटर स्वस्त झाले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol Price Today | सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) चे नवी दर जारी केले आहेत. 15 ऑगस्टला सुद्धा इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. लागोपाठ 29व्या दिवशी तेलाच्या किंमती स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या किंमती पाहता तामिळनाडु सरकारने यावरील टॅक्समध्ये 3 रुपये प्रति लीटरची कपात केली होती. तमिळनाडुचे अर्थमंत्री पी त्याग राजन यांनी राज्याच्या बजेटमध्ये या कपातीची घोषणा केली.

IOCLच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. मे महिन्यानंतर लागोपाठ वाढत असलेल्या पेट्रोलच्या किंमतीत 29 दिवसांपासून तेजी दिसत नाही. तर, मागील 42 दिवसात पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरपर्यंत महागले आहे. डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरपर्यंत महागले आहे.

 

जुलैमध्ये शेवटचे वाढले होते दर

18 जुलैच्या नंतर इंधनाचे दर स्थित आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 17 जुलैला शेवटचा बदल दिसून आला होता. 17 जुलैला पेट्रोल 30 पैसे प्रति लीटर महागले होते. तर, डिझेलचे दर स्थिर होते.

पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 15 August 2021)

दिल्ली पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

मुंबई पेट्रोल 107.83 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लीटर

चेन्नई पेट्रोल 102.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

कोलकाता पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

बेंगळुरु पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

लखनऊ पेट्रोल 98.80 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर

पाटणा पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.81 रुपये प्रति लीटर

भोपाळ पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर

जयपुर पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर

गुरुग्राम पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

Web Title :- Petrol Price Today | petrol diesel price today on 15 august 2021 tamilnadu govt 3 rs on petrol check your city price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा

PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम !