Pune Crime | बोलाई माता मंदिरात चोरी करणारा सराईत गजाआड, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे (Pune Crime) शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोलाई माता मंदिरातून (bolai mata temple) दागिन्यांची चोरी (Jewelry theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक (accused arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई समर्थ पोलिसांनी केली असून आरोपीकडून मंदिरातील चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अनिल हौशिलाल चव्हाण (वय-31 रा. वडजाई, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील (Pune Crime) बोलाई माता मंदिरात 12 ऑगस्टला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती.

मंदिरात चोरी झाल्यामुळे चोराला शोधण्याचे मोठे आव्हान समर्थ पोलिसांसमोर होते. चोरट्याचा शोध घेण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या (CCTV footage analysis) आधारे चोरट्याची माहिती गोळा केली. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आसपासच्या नागरिकांना दाखवून चोरट्याचा शोध सुरु केला.

दरम्यान, 23 ऑगस्टला पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी आरोपी मंगळवार पेठ येथे दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी अनिल चव्हाणला ताब्यात घेते. त्याची अंगझडतीमध्ये चोरी झालेली चांदीच्या घंटेसह मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सतिश भालेराव,
सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, महेश जाधव, सुभाष पिंगळे, शुभम देसाई, हेमंत पेरणे,
विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, सुमित खुट्टे यांनी केली.

Web Title : Pune Crime | theft in bolai mata temple accused arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Government | ठाकरे सरकारकडून राज्यातील लाखो अधिकार्‍यांना मोठा दिलासा ! मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 6 महत्वपूर्ण निर्णय

JEE Main-NEET 2021 | नीट आणि जेईई मेनच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, यावेळी नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या

Pimpri Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 198 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या इतर आकडेवारी