Pune Crime | दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) कासारसाई धरण (Kasarsai Dam) परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा (Engineering Student) धरणात बुडून मृत्यू (Death) झाला. शशांक सिन्हा Shashank Sinha (वय-19), रविकुमार विनोदकुमार Ravikumar Vinodkumar (वय-19) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार (Bihar) राज्यातील आहेत. ते आकुर्डी (Akurdi) येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात (D.Y. Patil Engineering College) दुसऱ्या वर्षात शिकत होते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास इतर चार मित्रांसमवेत ते फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात आले होते. त्यावेळी ते धरणाच्या पाण्याशेजारी उभे होते. (Pune Crime)

 

त्यापैकी तीनजण पाय घसरून पाण्यात पडले. त्यातील एकाला उर्वरीत मित्रांनी बाहेर काढले.
परंतु पाणी खोल असल्याने शशांक व रविकुमार हे बुडाले. त्यांना स्थानिक तरुणांनी पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिरगाव परदंवडी पोलीस (Shirgaon Pardanwadi Police) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | two engineering students drown in kasarasai dam pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission DA Arear | 18 महिन्याच्या DA एरियर बाबत आली मोठी माहिती, सॅलरीत येतील 2 लाख रुपये, झाले कन्फर्म

 

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

 

OBC Reservation Maharashtra | SC ने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर ठाकरे सरकारने निवडणुकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय !

 

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’; 3059 सराईतांची केली तपासणी; 722 गुन्हेगार मिळून आले