Pune Crime | महिला पोलीस कर्मचार्‍याला अश्लिल शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण

पुणे : Pune Crime | वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) एका महिलेची गाडी उचलली. त्याची चौकशी महिला पोलीस कर्मचार्‍याकडे करुन तिला अश्लिल शिवीगाळ करुन चप्पलेने मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) एका महिलेला अटक केली आहे. (Pune Crime)

सिता रमेश पुजारी (वय ३५, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागातील एका महिला पोलीस शिपायाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९७/२२) दिली आहे. हा प्रकार अलका टॉकीजजवळील टिळक चौकात बुधवारी दुपारी दीड वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शासकीय कर्तव्य करीत असताना सिता पुजारी या टिळक चौकात आल्या. त्यांनी फिर्यादीचे जवळ येऊन माझी गाडी येथे का आणली, अशी विचारणा केली.
त्यावर त्या म्हणाल्या, मला माहिती नाही, तुमची गाडी येथे का आणली आहे.
मी या विभागाची नसून तुम्ही शेजारील ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा, असे सांगितले.
त्यावर तिने तू पोलीस खात्यात असून तुला माहित नाही का?,
असे उदधटपणे बोलून तिने तिच्या पायातील चप्पल काढून हातात घेऊन फिर्यादीचे पायावर, छातीवर मारहाण केली.
या झटापटीमध्ये फिर्यादीच्या गणवेशाच्या पॅन्टचे बटण तोडले. त्यांचे लाईनयार्ड बाहेर ओढले.
डोक्यावरील केस ओढून त्यांना तिने अश्लिल शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणला.
पोलीस उपनिरीक्षक साळुंखे (Sub-Inspector of Police Salunkhe) तपास करीत आहेत.

Advt.

Web Title :-Pune Crime | Women police personnel were abused with slippers and beaten

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | …तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल (व्हिडिओ)

Ganga Maha Aarti | गंगेनंतर आता नाशिकच्या दक्षिण गंगेची ही महाआरती, झाला ‘एवढा’ निधी मंजूर