Devendra Fadnavis | …तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अभिमान होता. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कोणी चुकीचं बोललं, तर त्याला जशास तसं उत्तर मिळत होतं. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) इतकं नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पदयात्रा करतात, याचं वाईट वाटतं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली. आज मुंबईत शिंदे गटाकडून (Shinde Group) ‘वारसा विचारांचा परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.
तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा…
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, तुमचे-आमचे मतभेद झाले असतील, मान्य आहे. तुम्ही आम्हाला सोडलं, आम्हाला शिव्या द्या. मात्र सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.
जो विचारांचं नातं सांगेन तोच…
बाळासाहेबांशी नातं हे रक्ताने होत नाही तर ते विचाराने असावं लागतं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो विचारांचं नातं सांगेन तोच बाळासाहेबांचा खरा अनुयायी असेल, त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. रक्ताने एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील, पण वाचाराने एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
LIVE | वारसा विचारांचा परिसंवाद व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून वाहन वाटप तसेच स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम | मुंबई https://t.co/50mLmHCxOk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 16, 2022
त्यांना सावरकरांचा ‘स’ सुद्धा माहित नाही
रोज खोटं बोलायचं हे काँग्रेसचं (Congress) कामच आहे. सावरकरांबद्दल काँग्रेस रोज खोटं बोलतं. राहुल गांधी यांना जनताच उत्तर देईल. राहुल गांधी यांना योग्यपद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यांना सावरकरांचा ‘स’ सुद्धा माहित नाही. सावरकरांइतके दुसऱ्या कोणत्याही नेत्याने अत्याचार भोगले नाहीत. हिंदू समाज एकत्र आणण्याचं काम सावकर यांनी केलं. जोपर्यंत हिंदू समाज एकत्र होता तोपर्यंत मजबूत होता. हिंदुत्व हीच जीवनपद्धत आहे. हाच सावरकरांचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. मात्र आता आदित्य ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भारत जोडोच्या नावाखाली काँग्रेस जोडो (वाचवो) करणाऱ्या या फरिश्त्याला इतिहास माहीत आहे का??
दोन जन्मठेपा म्हणजे काय माहित आहे का युवराज@RahulGandhi ? महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान?? आम्ही अजिबात सहन करणार नाही… @mieknathshinde @ashokchavan #भारतजोडो #स्वातंत्र्यवीरसावरकर pic.twitter.com/5v255M8wvf— Naresh Mhaske (@nareshmhaske) November 16, 2022
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सावरकर यांना दोन, तीन वर्षांसाठी अंदमान जेलमध्ये (Andaman Jail) ठेवले तर त्यांनी लगेच इंग्रजांना (British) चिठ्ठी लिहीनं चालू केलं.
मला माफ करा, तुम्हाला जे लागतं ते घ्या पण मला मुक्त करा असं सावरकर यांनी म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis criticized rahul gandhi and aditya thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…
Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे