Pune Crime | ‘कलेक्टर’ बनून ‘अनिता’नं घातला अनेकांना ‘गंडा’, पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंट गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील (Pune Collector office) एका महिला एजंटने आपण जिल्हाधिकारी व तहसिलदार (Collector & Tehsildar) असल्याची बतावणी करुन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) या महिलेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतही (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) वावर असल्याने त्या ठिकाणच्या काही जणांना गंडा घातला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिलेविरोधात आतापर्यंत पाच जणांनी तक्रार दिली असून लाखो रुपयांची फसवणूक (Crime) केल्याचे समोर आले आहे.

अनिता भिसे (Anita Bhise) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गेश्वरी चित्तर (Durgeshwari Chittar) (वय-47 रा. उत्तम टाऊन स्केप सोसायटी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. अनिता भिसे या महिलेने अपंगांसाठी शासकीय भुखंड (Government plot) मिळवून देण्याचे अमिष दाखवले होते. त्यासाठी चित्तर दाम्पत्याकडून 27 लाख 50 हजार रुपये घेतले होते. भूखंड न मिळाल्याने चित्तर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Pune Crime | yerwada police arrested anita bhise who cheat lot of peoples as fake collector

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख (Senior Police Inspector Younus Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उप निरीक्षक हनुमंत भोसले यांनी अनिता भिसेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता बनावट शिक्के, बनावट कागदपत्रे तसेच इतर काही लोकांना नोकरीस लावण्यासाठी तयार केलेली बनावट कागदपत्रे सापडली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

चित्तर दाम्पत्याप्रमाणे इतर 5-6 जणांनी अनिता भिसे या महिलेच्या विरोधात तक्रार दिली आहे. आतापर्यंत या महिलेने 50-60 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे. अशा लोकांनी येरवडा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj
Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (Assistant Commissioner of
Police Kishor Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector
Younus Shaikh), पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay
Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे,
उप-निरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती
भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी केली.

हे देखील वाचा

Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 294 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | yerwada police arrested anita bhise who cheat lot of peoples as fake collector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update