आधुनिक तंत्रज्ञानामुळे गंभीर गुन्ह्यातील प्रकरणाला गती ; पोलिस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे यांचे प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी खोटे बोलत असतो, त्यामुळे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे होते आणि पोलिसांना तपास करताना अडचणी येतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते सहज पकडले जात आहेत, त्यामुळे आरोपींच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या तंत्राचा उपयोग पोलीस दलास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने सायबर सुरक्षा काळाची गरज बनत चालली आहे. त्याचा सर्वांनी माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे मत पोलिस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे यांनी व्यक्त केले.

पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथे डिजिटल टास्क फॉर्स आणि ग्लोबल साइबर क्राइम हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर क्राईम हेल्पलाइन अवार्ड 2019’चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, माजी सहायक पोलिस आयुक्त भानूप्रताप बर्गे, वकील नंदू फडके, डिजिटल टास्क फॉर्सचे संस्थापक अध्यक्ष रोहन न्यायाधीश, वकील शिशिर हिरे, कुलसचिव शिवाजी विद्यपीठ कोल्हापूर डॉ. विलास नांदवडेकर, ट्रिनिटी महाविद्यालयाचे डॉ. निलेश उके, सुमित ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर साळुंके उपस्थित होते.

Police

नंदू फडके म्हणाले, नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत सर्वच क्षेत्रात त्याचा फायदा होताना दिसत आहे. तसेच याची दुसरी बाजू लक्षात घेतली तर विविध लिंक च्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणे, सोशल मीडियावरून मानसिक देणे, बदनामी करणे असे प्रकारही वाढले आहेत त्यासाठी सायबर क्राईम बद्दलचे कायदे, कलम जाणून घेणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर समाजात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम विषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.

धनंजय देशपांडे म्हणाले, माणूस खोटं बोलू शकतो पण तंत्रज्ञान खोटे बोलत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित होतील आणि त्याचा फायदा पोलीस प्रशासन आणि इतर संस्थांना होत राहील. जेव्हा जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर आपण खाजगी माहिती देत राहतो परंतु याचा गैरफायदा काही लोक घेतात त्यामुळे त्याचा चांगला वापर करावा. आजचे जीवन खूप धकाधकीचे होत चालले आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढत चालला आहे. त्यासाठी लाईफ सेविंगचे काम केले पाहिजे. सायबर सुरक्षा क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार श्रेणी:
1) Ambassadors of Indian Cyber Crime investigator
चैतन्य मंडलिक, (आयपीएस, पोलिस अधीक्षक, गुजरात), कल्पना गाडेकर, एसीपी, एटीएस मुंबई, संगीता शिंदे अल्फोन्सो, उप एसपी डीसीएससी ठाणे, निलय मिस्त्री सहाय्यक प्राध्यापक, राज्य सरकार गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी,

2) Trendsetter of Technology of India
धनंजय देशपांडे, सोशल मीडिया तज्ज्ञ आणि कौन्सिलर आणि लाइफ सेव्हर, अर्चना मोरे, रिपोर्टर पुणे मिरर, टाईम्स ऑफ इंडिया, अ‍ॅड.चैतन्य भंडारी उद्योजक

3) Backbone of Indian Technical Academics
मनीषा ए. कुंभार प्रोफेसर, एसआयओएम-एमसीए सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्वाती सायनकर, के.बी. जोशी माहिती तंत्रज्ञान संस्था

4) Techno Legal Pioneers of India
अ‍ॅड करिश्मा पुष्कर – पाटील, अ‍ॅड सिओल शहा, अ‍ॅड.पुष्कर दुरगे

5) Fortune Hunters of Digital India
ई स्कॅन मधील अजित कीर्तने सुरक्षा विश्लेषक आणि टेक्नो व्यावसायिक तज्ञ, अमर ठाकरे उद्योजक व सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ, उरवेश ठक्कर सायबर गुन्हे अन्वेषक आणि सुरक्षा विश्लेषक.

सूत्रसंचालन नीता खिस्ते यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/