Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक, नोंदणीकृत एजंटच्या साथीदाराला सायबर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | पुण्यातील येरवडा (Yerwada) परिसरातील इझी पे प्रा.लि. कंपनीची (Easy Pay Private Limited) साडे तीन कोटी रूपयांची फसवणूक (Cheating Case) करणार्‍या कंपनीच्याच नोंदणीकृत एजंटला (Registered Agent) सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पश्चिम बंगाल येथून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या साथीदाराला पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि.22) केली. (Pune Cyber Crime News)

Pune Cyber Crime News,Pune Cyber Crime ,येरवडा ,Yerwada,इझी पे प्रा.लि. कंपनी,Easy Pay Private Limited,फसवणूक ,Cheating Case,नोंदणीकृत एजंट,Registered Agent,सायबर पोलिस,Pune Cyber Police,पश्चिम बंगाल,Bengal,अंकित कुमार अशोक पांडे, Ankit Kumar Ashok Pandey,अटक,छोटू उर्फ एजाज आलम जिआऊल अन्सारी ,Chhotu alias Ejaz Alam Jeaul Ansari,कुरमेडी बाजार,शिवाजीनगर परिसर,Shivajinagar,तोफखाना परिसर,सायबर पोलिस,Pune Police,मोबाईल हॅन्डसेट,Mobile Handset,पोलिस आयुक्त रितेश कुमार,IPS Ritesh Kumar,सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक ,IPS Sandeep Karnik,अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे ,IPS Ramnath Pokale,पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे ,DCP Shriniwas Ghadge,सहाय्यक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे ,ACP Appasaheb Shewale,वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील ,Senior PI Minal Supe Patil

अंकित कुमार अशोक पांडे Ankit Kumar Ashok Pandey (20, सध्या रा. सी/18, निबे दितो पार्क, ममरा, दुर्गापुर, बर्धमान, पश्चिम बंगाल. मुळ रा. महेश दिन गाव, काजीया, गोडापूर, नवादा, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पांडे याचा तांत्रीक माहितीचे विश्लेषण करुन पश्चिम बंगाल येथून 12 जुलै रोजी अटक केली होती. तर त्याचा साथीदार छोटू उर्फ एजाज आलम जिआऊल अन्सारी Chhotu alias Ejaz Alam Jeaul Ansari (वय-28 रा. कुरमेडी बाजार, सहजानंद शाळेजवळ, बालीडी, झारखंड, मूळ रा. रेगनीय पोस्ट झरी, थाना आसम, गया, बिहार) याला शिवाजीनगर परिसरातून शनिवारी अटक केली आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अंकितकुमार पांडे याचा साथीदार छोटू शिवाजीनगर (Shivajinagar) येथील तोफखाना परिसरात येणार असल्याची माहिती सायबर पोलिसांना (Pune Police) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी छोटूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्याला न्यायासमोर हजर केले असता 31 जुलै 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इझी पे प्रा.लि. येरवडा ही कंपनी भारतभर ऑनलाइन पेमेंटची सुविधा नागरिकांना पुरविण्याचे काम करते. त्यासाठी कंपनीने भारतभर नोंदणीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. दि. 11 ऑगस्ट 2022 पासून कंपनीतील नोंदणीकृत असलेल्या एकुण एजंटांपैकी तब्बल 65 एजंटांनी आपआपसात संगणमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अ‍ॅप व्दारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक (Fraud Case) करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त 2 ते 4 व त्यापेक्षत्त जास्त वेगवेगळ्या मोबाईल हॅन्डसेटचा (Mobile Handset) वापर करून अनधिकृतपणे सदर मोबाईलव्दारे लॉग ईन आयडीने लॉग ईन करून कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला.

कंपनीचे व्हीपीए खात्यामधून त्यांनी इतर 44 बँक अकाऊंटवर एजंटचे
कमिशन व्यतिरिक्त तब्बल 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रूपये
आणि 82 पैसे रूपये वर्ग करून कंपनीची फसवणूक केली.
त्यामुळे कंपनीने पुण्यातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये
(Pune Cyber Police Station) तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 419, 420, 39 सह माहिती तंत्रज्ञान कायदा
(IT Act) कलम 43/66, 66 डी कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. (Pune Cyber Crime News)

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे
(DCP Shriniwas Ghadge), सहाय्यक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे
(ACP Appasaheb Shewale) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Senior PI Minal Supe Patil),
पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, निलेश लांडगे, शाहरुख शेख, किरण जमदाडे,
बाबासाहेब कराळे, आनंदराव भंडलकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार
स्थानबद्ध ! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 32 वी MPDA ची कारवाई