Pune Cyber Crime News | पुणे सायबर क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – बाणेरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरलाच क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करण्याचा बहाणा करुन दीड लाख रुपयांना फसवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | स्टेट बँक ऑफ इंडियातून (State Bank Of India) आलेले क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टीव्हेट (Credit Card Activation) करण्याचा बहाणा करुन सायबर चोरट्याने ओटीपी (OTP) घेऊन एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Cheating With Software Engineer) दीड लाख रुपयांना गंडा (Fraud Case) घातला. (Pune Cyber Crime News)

 

याबाबत बाणेर (Baner) येथील ४१ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९३/२३) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका सॉफ्टवेअर कंपनीत मानवी संसंधान विभागात काम करीत आहेत. त्यांचे एस बी आय बँकेचे क्रेडिट कार्डची मुदत संपत होती. त्यामुळे बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड त्यांच्या राहत्या घरी पोस्टाने आले. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्याने आपण एस बी आय क्रेडिट कार्ड डिव्हिजन मधून बोलत आहे,असे सांगितले. नवीन क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी मागितला. फिर्यादी यांनी बँकेतून फोन आल्याचे समजून त्यांना ओटीपी दिला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ४५ हजार ५७, ४६ हजार ५७, ४५ हजार ६९७, आणि ७ हजार १६४ रुपये असे चार ट्रान्जेक्शनमधुन १ लाख ४४ हजार ८१६ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. (Pune Cyber Crime News)

फिर्यादी यांनी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन चेक केले असता त्यांच्या ट्रॉन्झेक्शनचे ओटीपी त्यांच्या मोबाईलवर न येता त्यांना आलेल्या मोबाईल फोनवर गेल्याचे दिसून आले. त्यांचे नवीन क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करताना सायबर चोरट्यांनी त्यांचा अक्सेस स्वत:कडे घेऊन फसवणूक केली.

 

Web Title :  Pune Cyber ​​Crime News | Chatushringi Police Station – A Software Engineer in Baner was cheated of Rs 1.5 lakh on the pretext of activating a credit card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा