Pune Cyber Crime News | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन आर्थिक फसवणूक, ‘शाहरूख खान’ला पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधून केली अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) तयार करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना फोन करुन आर्थिक फसवणूक (Cheatin Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News) या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) तांत्रिक तपासावरुन आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Cyber Crime News)
शाहरूख काटुला खान Shahrukh Katula Khan (वय -23, रा. खानजादवाडी मोहल्ला, अलवर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत योगेश दिगंबर बोरसे यांनी फिर्य़ाद दिली आहे. पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) आयपीसी 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime News)
आरोपीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाचा व फोटोचा वापर करुन बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले. यावरुन फिर्यादी यांना राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा सीआरफीएमध्ये असलेला मित्र संतोष कुमार जुने फर्निचर कमी किमतीत वकत असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांना फोन करुन संतोष कुमार बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी 70 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 70 हजार रुपये पाठवले. पैसे ट्रान्सफर करुन देखील फर्निचर मिळाले नसल्याने फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक (Fraud Case) झाल्याची तक्रार दिली. हा प्रकार 22 जुलै रोजी घडला होता.
पुणे सायबर पोलिसांनी बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता आरोपी राजस्थान येथील अलवर याठिकाणी
असल्याची माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन आरोपीला 4 ऑक्टोबर रोजी ताब्यात
घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून एक
मोबाईल व त्यातील दोन सीम कार्ड जप्त केले आहेत. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले
असता कोर्टाने आरोपीला 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), आर्थिक व सायबर
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे
(ACP RN Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (Sr PI Minal Supe Patil),
पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले (PSI Tushar Bhosale), पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव,
निलेश लांडगे, शाहरुख शेख यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा