Pune Traffic Updates News | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेचा मोठा निर्णय, येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात जड वाहनांना बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates News | येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील रस्ते सकाळी व सायंकाळी अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Pune Traffic Updates News)

येरवडा (Yerwada), मुंढवा (Mundhwa), कोरेगाव पार्क (Koregaon Park) भागातील रस्त्यांवर सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 6 ते रात्री 1 पर्यंत अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. नगर रस्त्यावरून शास्त्रीनगर चौक आणि रामवाडी चौक येथून आगाखान पूलमार्गे कोरेगाव पार्क, तसेच मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Updates News)

कोरेगाव पार्क परिसरातून साऊथ मेन रस्ता (South Main Raod), नॉर्थ मेन रस्ता (North Main Road),
बर्निंग घाट (Burning Ghat Road) रस्त्यावरुन एबीसी फार्म हाऊस (ABC Farms Pune) चौकमार्गे कल्याणीनगर
आणि मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून कोरेगाव पार्क कडे येणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, असे वाहतूक शाखेने कळवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shalini Thackeray On Sushma Andhare | राज ठाकरेंच्या नातवावरुन रंगले राजकारण; शालिनी ठाकरेंचा अंधारेंना इशारा, म्हणाल्या – ‘अन्यथा कानाखाली वाजवू डीजे…’