Pune Cyber Crime | ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने 35 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला मुंबईतून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाइन टास्कच्या (Online Task) आमिषाने फसवणूक (Online Cheating Case) करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर चोरट्यांनी ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने एकाची 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी गुरुवारी (दि.14) मुंबईतून अटक केली आहे. आरोपीने ऑनलाईन टास्कमध्ये गुगलवर रिव्ह्यू केल्यास जादा कमिशनचे आमिष दाखवले होते. (Pune Cyber Crime)

तुषार प्रकाश अजवानी (वय-37 रा. वॉटरफोर्ड जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तुषारने फिर्यादीला ‘पार्ट टाईम’ नोकरीचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. त्यानंतर गुगलवर एका कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार तुषार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा करुन विश्वास संपादन केला. (Pune Cyber Crime)

फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी ज्यादा फायद्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी वेळोवेळी 34 लाख 97 हजार रुपये जमा केले. मात्र, कोणताही परतावा न मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुणे सायबर पोलिसांनी बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता आरोपी मुंबईतील जुहू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनील सोनुने यांचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपी तुषार याचा शोध घेऊन गुरुवारी अटक केली.
न्यायालयाने आरोपीला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP RN Raje)
यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (Sr PI Minal Supe Patil) यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शुक्रवार पेठ: सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या