Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी अनिस सुंडके MIM चे उमेदवार; रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी एमआयएम आपला उमेदवार उभा करणार असल्याचे वृत्त पोलीसनामा ऑनलाईनने कालच दिले होते.असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या उपस्थितीत झालेल्या एमआयएमच्या बैठकीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Pune Lok Sabha Election 2024 )

अनिस सुंडके हे अजित पवार यांचे विश्वासू आहेत, ते पुण्यातील कोंढवा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचा भाग शिरुर लोकसभा मतदारसंघात येतो. आश्चर्याचा आणखी एक धक्का म्हणजे मागील काही दिवसांपासून अनिस सुंडके हे शिरुरचे अजित पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते.

आता अचानक अनिस सुंडके यांची पुणे लोकसभेच्या लढतीत एंट्री झाली आहे. पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरणार आहोत. निवडणूक लढविली पाहिजे, अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुणे लोकसभा निवडणुकीत एमआयएम उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील.

अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची काँग्रेसची पारंपारिक समजली जाणारी मुस्लिम बांधवांची मते विभागली जातील, अशी ही खेळी आहे. त्यामुळे अगोदरच वंचितमुळे अडचणीत आलेल्या धंगेकरांची वाट सुंडके यांच्यामुळे आणखी बिकट होणार आहे.

एमआयएमकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यावर अनिस सुंडके यांनी म्हटले की,
२५ वर्षांपासून मी पुण्यात काम करतोय. पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू.
पुण्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध आहेत.
यापूर्वी मी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेय.
पुणे महानगर पालिकेत Pune Municipal Corporation (PMC) पण काम केले आहे.
माझा लोकांशी चांगला संपर्क आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज