Pune : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ मंदिर उघडं राहणार का? ट्रस्टनं दिली ‘ही’ माहिती

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला बुधवारी (दि. 31) दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होणार आहेत. गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्य़क्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.

शहर व उपनगरांतून हजारो भाविक संकष्टी चतुर्थीला मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी. तसेच घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर आदी माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे.