Pune : मार्केटयार्डातील दुकानावरून वाद, 5 जणांविरूध्द फसवणूकीचा FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मार्केटयार्ड येथे 1977 साली भाड्याने दिलेले दुकान खाली करण्यावरून मालक आणि भाडेकरूत वाद झाला. भाडेकरूच्या तक्रारीवरून पाच जणांवर शासनाची फसवणूक आणि दुकानातील माल चोरून नेल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजकुमार सेठी (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमजितसिंग रामगडीया (वय 45), फत्तेसिंह व्होरा (वय 42), सुरेंदर रामगडीया (वय 43), कुलवंदरकौर बाबरा (वय 49), चिदानंद वाघमारे (वय 42) यांच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार यांना 1977 साली हे दुकान भाड्याने दिले आहे. त्यावेळी भाडे 1200 रुपये होते. परमजितसिंग यांच्या वडिलांनी हे दुकान भाड्याने दिले होते. दरम्यान आरोपींनी दुकानातील रोकड आणि साहित्य असा 16 लाख 12 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. तसेच सर्वांनी मिळून दुकान फिर्यादी यांच्या ताब्यात असताना देखील शांततापूर्ण हे दुकान फत्तेसिंह व्होरा यांना ताब्यात दिले असल्याचा खरेदी खतात देऊन शासनाची व फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे म्हंटले आहे. तर, त्यांचे नोकर व त्यांना दुकानात येण्यापासून प्रतिबंध करत संपत्तीपासून वंचित ठेवले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक दाबेराव हे करत आहेत.