
Pune DPDC News | डीपीडीसीकडून आरोग्य सुविधांसाठी 12 कोटी 68 लाखांचा निधी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune DPDC News | जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांसाठी १२ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. सन २०२१-२२ या वर्षातील १९४ अपूर्ण कामांसाठी हा निधी जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. (Pune DPDC News)
या १९४ अपूर्ण कामांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक दवाखान्यांची देखभाल दुरूस्ती, बांधकाम, विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी या कामांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी ११ कोटी ९४ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. अशाप्रकारे एकूण २४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. (Pune DPDC News)
कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर पुरवताना प्रशासनाची दमछाक झाली होती.
त्यामुळे स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून त्याकरिता डीपीसीमधून निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे आणि विस्तारीकरणाचा देखील समावेश असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे.
Web Title :- Pune DPDC News | 12 crore 68 lakhs fund from DPDC for health facilities
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | ‘उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील’ – राज ठाकरे
Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा